सांगली : गेल्या काही दिवसात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासी जीपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आईसह 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेक करताना ही धक्कादायक घटना घडली.
काय आहे संपूर्ण घटना –
सांगली शहरातील कुमठेफाटा जवळ भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात याठिकाणी हा भीषण अपघात घडला.
ओव्हरटेक करीत असताना वडापने दुचाकीला उडविल्याने हा अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये सबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपाली विश्वास म्हारगुडे (वय 31, रा. तळेवाडी, ता. आटपाडी. सध्या संजयनगर सांगली), त्यांचा मुलगा सार्थक (वय 7) व राजवीर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. तर विश्वास दादासो म्हारगुडे (वय 33) असे गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.
दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघाले होते. दरम्यान, ते कुमठेफाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणार्या प्रवाशी जीपने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. तसेच या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच महिलेच्या गंभीर जखमी झालेल्या पतीवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. याठिकाणी आईसह 2 मुलांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
….अन्यथा थेट तुरुंगात जाल; जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सर्व पालकांसाठी महत्त्वाची सूचना