• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

युवकांना कायद्याचे ज्ञान देणे आवश्यक – न्यायाधीश एस. एस. बडगुजर यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 7, 2023
in नंदुरबार, करिअर, ताज्या बातम्या
युवकांना कायद्याचे ज्ञान देणे आवश्यक – न्यायाधीश एस. एस. बडगुजर यांचे प्रतिपादन

अक्कलकुवा (नंदुरबार), 7 नोव्हेंबर : कायद्याच्या अज्ञानामुळे नकळत काही गुन्हे घडले तर तुमचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. सायबर क्राइममध्येही युवक अडकत आहेत. यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे काम लोकांपर्यंत कायदा पोहोचवण्याचे आहे. युवकांनाही या कायद्यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश एस. एस.बडगुजर यांनी केले.

कायदेविषयक शिबिराचे आयोजन –
युवक-युवतीमध्ये विविध कायद्यांबाबत ज्ञान वाढावे, जनजागृती व्हावी, यासाठी विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक जनजागृतीच्या उपक्रमांचे सतत आयोजन करीत असल्याचेही न्यायधीश एस.एस.बडगुजर यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक अक्कलकुवा येथील औधोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन आज (07 नोव्हेंबर) करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

न्यायाधीश एस .एस. बडगुजर मार्गदर्शन करताना.
न्यायाधीश एस .एस. बडगुजर मार्गदर्शन करताना.

रॅगिंगबाबत महत्वाचे मार्गदर्शन –
मार्गदर्शन करताना ॲड. पी. आर. ठाकरे यांनी सांगितले की, कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्यात धास्तीची, भयाची, लज्जेची किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल, असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे म्हणजे रॅगिंग अशी याची व्याख्या कायद्यात करण्यात आली आहे.

रॅगिंगमध्ये या कृत्यांचा समावेश –
ते पुढे म्हणाले की, रॅगिंगमध्ये विद्यार्थ्याला चिडवणे, शिवीगाळ, धमकावणे किंवा त्याच्या खोड्या काढणे, किंवा मनाला टोचेल असे बोलणे; किंवा विद्यार्थी, सर्वसामान्यपणे जे कृत्य किंवा जी गोष्ट स्वेच्छेने करणार नाही असे कृत्य किंवा अशी गोष्ट त्यास करावयास सांगणे या कृतींचा समावेश करण्यात आला आहे.

सायबर लॉ व सायबर क्राईमवर मार्गदर्शन –
अक्कलकुवा तालुका विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य ॲड. संग्राम पाडवी यांनी ‘सायबर लॉ व सायबर क्राईम’ या विषयावर सायबर क्राईम कसा वाढतोय तसेच सायबर क्राईम पासून आपण सगळ्यांनी कसे सावध राहिले पाहिजे यासाठी सायबर क्राईमवरील अनेक उदाहरणे देत मार्गदर्शन केले. ॲड. जितेंद्र वसावे यांनी वाहतूकीचे नियमांसंदर्भात मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रस्तावित ॲड.रुपसिंग वसावे यांनी केले व या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गट निर्देशक जी.डी.सामुद्रे, ॲड.फुलसिंग वळवी, ॲड.रामसिंग वळवी, ॲड.जेठ्या वळवी, ॲड. आर.डी. पाडवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम.एच.काळे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकुवा न्यायालय कर्मचारी मयुर पाटील, एस.के अहिरे, धिरसिंग वळवी, योगेश वसावे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जे.पी.मोरे, ए. सी.शिवपुजे, ए.एन वळवी, सी.जी.वळवी, पी.व्ही.वानखेडे, बी.आर.बागुल यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page