छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवद्गीता यांचं आयुष्यात मोठं स्थान आहे, असे विश्वविजेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर म्हणाला. नुकताच भारतीय खो-खो संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. यानिमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने कर्णधार प्रतीक वायकर याची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्याने आपला आतापर्यंतचा खो-खो प्रवास कसा राहिला याबाबत माहिती देत तरुणाईलाही मोलाचा सल्ला दिला.