सुनिल माळी/संदीप पाटील, प्रतिनिधी
एरंडोल, 4 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती तसेच इतर पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. दरम्यान, उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज 4 नोव्हेंबर रोजी माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस होता. दरम्यान, एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून एकूण 7 उमेदवारांनी माघार घेतली असून 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.
‘या’ उमेदवारांनी घेतली माघार –
1. हेमलता अशोक पाटील
2. दादा देवराम शिरसाठ
3. चिमणराव रूपचंद पाटील
4. शाकिर अहमद अब्दुल सत्तार
5. डॉ. क्रांती संभाजीराजे पाटील
6. गायत्रीबाई भगवान पाटील (महाजन)
7. नानाभाऊ पोपट महाजन
‘हे’ उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात –
- डॉ. सतीश भास्करराव पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – तुतारी वाजवणारा माणूस
- अमोल चिमणराव पाटील – शिवसेना – धनुष्यबाण
- प्रशांत दिनकर पाटील – अपक्ष – ऑटो रिक्षा
- अमित राजेंद्र पाटील – अपक्ष – ट्रम्पेट
- अरूण रोहिदास जगताप (न्हावी) – अपक्ष – मनुष्य व शिड युक्त नाव
- आण्णासाहेब सतिश भास्करराव पवार (पाटील) – अपक्ष – स्टेथोस्कोप
- दत्तू रंगराव पाटील – अपक्ष – पेंडुलम
- अे.टी. नाना पाटील – अपक्ष – ऊस शेतकरी
- भगवान आसाराम पाटील (महाजन) – अपक्ष – शिट्टी
- सुनिल रमेश मोरे – अपक्ष – प्रेशर कुकर
- डॉ. संभाजीराजे आर. पाटील – अपक्ष – गॅस सिलेंडर
- इंजी. स्वप्नील भगावान पाटील – अपक्ष – एअर कंडिशनर
- डॉ. हर्षल मनोहर माने (पाटील) – अपक्ष – बॅट
हेही वाचा : Pachora Breaking : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार