• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा जळगावात शुभारंभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 18, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव, 18 मे: पिकांची उत्पादकता वाढवितानाच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक व अधिक कार्यक्षम नॅनो खतांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा जळगावात शुभारंभ –

इफको संस्थेच्या “नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे”चा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात  करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील गावोगावी नॅनो खतांचा प्रचार-प्रसार तसेच नॅनो डीएपी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

सध्याच्या जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, तसेच ‘अलनिनो’सारख्या हवामान बदलाच्या संकटांच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत आणि उत्पादनक्षम ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर यांसारखी खते कमी प्रमाणात वापरूनही अधिक परिणामकारक ठरतात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जळगाव जिल्हा हा रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, पारंपरिक युरियाचा अतिरेक आणि अशास्त्रीय वापर जमिनीच्या आरोग्यासह पाण्याच्या गुणवत्तेलाही धोका निर्माण करत आहे. युरियाच्या विघटन प्रक्रियेमुळे तयार होणारे नायट्रेट घटक जमिनीतून झिरपून भूगर्भातील पाण्यात मिसळतात, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण वाढत असल्याची बाबही यावेळी अधोरेखित करण्यात आली.

तसेच, युरियाच्या वापरातून निर्माण होणारे अमोनिया व नायट्रस ऑक्साईडसारखे वायू वातावरणात मिसळून हवेचे प्रदूषण वाढवत असल्याने पारंपरिक खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शिफारस केलेल्या मात्रेत व शास्त्रीय पद्धतीने खतांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

या समस्यांवर उपाय म्हणून विकसित करण्यात आलेले ‘नॅनो युरिया’ हे द्रवरूप खत अत्यंत सूक्ष्म कणांद्वारे पिकांना थेट उपलब्ध होते. पानांद्वारे शोषले जाणारे हे कण पिकांच्या गरजेनुसार कार्यरत राहतात, त्यामुळे त्याची कार्यक्षमता सुमारे ९० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. याउलट पारंपरिक युरियाची कार्यक्षमता केवळ २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते.

यावेळी शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात किमान २५ टक्के पारंपरिक खतांचा वापर कमी करून नॅनो खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन करण्यात आले. यामुळे जमिनीचे, पाण्याचे व हवेचे प्रदूषण टाळून शेती अधिक शाश्वत व पर्यावरणपूरक बनविता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के तसेच जळगाव जिल्हा परिषदचे अधिकारी आणि इफकोचे जिल्हा प्रतिनिधी संदीप रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: dm rohan ghugeiffcojalgaon newsnano fertilizers farmer awareness campaignsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page