सुरुवातीला भारतीय सैन्यदलात शिपाई पदावर भरती झाल्यानंतर सेवा बजावत असताना दुसरीकडे मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि आता 42 व्या वर्षी लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचण्याचा मान ज्यांनी मिळवला, असे खान्देशचे सुपूत्र अशोक विक्रम पाटील यांची सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील सोनबर्डीचे सुपूत्र अशोक पाटील यांनी आपला शिपाई ते लेफ्टनंटपर्यंतचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास उलगडला. तसेच तरुणाईला मोलाचा सल्लाही दिला.