नागपूर, 19 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2024 साठी विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया पार पडली.
पाच मतदारसंघातील एकूण मतदान –
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरु झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.85 टक्के मतदान झाले.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे –
- रामटेक 52.38 टक्के
- नागपूर 47.91 टक्के
- भंडारा- गोंदिया 56.87 टक्के
- गडचिरोली- चिमूर 64.95 टक्के
- चंद्रपूर 55.11 टक्के आहे.
विदर्भातील प्रमुख लढती –
हेही वाचा : जळगाव-रावेर लोकसभा निवडणूक 2024, दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’ उमेदवारांनी घेतले अर्ज