मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 16 जुलै : खान्देश साहित्य संघ सुरत (गुजरात) व मानवता बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरत येथे आयोजित आंतरराज्य काव्य संमेलनात चोपडा येथील “महाजन इंग्लिश क्लासेस” चे संचालक दिपक महाजन यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमप्रसंगी खान्देशातील अहिराणी साहित्यिक रत्ना पाटील, कस्तुरी मंच पुणेचे अध्यक्ष विजया मानमोडे, डॉ.सदाशिवराव सुर्यवंशी, गझलकार प्रा. नरेंद्र खैरनार, दंगलकार नितिन चंदनशिवे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी क्ष.मा.स.सु.मं.महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातचे उपाध्यक्ष सुरेश भिला महाजन, बीएसएफ जवान मनोहर महाजन तसेच संस्थाचालक व ख्यातनाम साहित्यिक,लेखक ,गायक व कवी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, दिपक महाजन यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी व समाज बांधवाकडून अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत