• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 5, 2026
in जळगाव जिल्हा, जामनेर, ताज्या बातम्या
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेर, 5 जून: जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरातील साईनाथ नगर परिसरातील एका घरगुती गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 9 लाख १५ हजार ४१६ रुपयांच्या किमतीची १ हजार १६ संशयास्पद HTBT कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना साईनाथ नगर, वाकी रोड परिसरात राहणारा दीपक राजमल चौधरी हा आपल्या घरात बेकायदेशीररीत्या HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा करून ठेवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री सुमारे ११.४५ वाजता संबंधित घरावर छापा टाकला.

९.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत –

झडतीदरम्यान घरातील एका खोलीत ३९ पॅकबंद व एक उघडलेली अशा एकूण ४० गोण्यांमध्ये साठवून ठेवलेली १ हजार १६ कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये ‘Diya-59 (KDCHH 02 BG II)’ व ‘Krish-45 (KDCHH 065 BG II)’ या वाणांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ९ लाख १५ हजार ४१६ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान जप्त बियाण्यांवर उत्पादक म्हणून अहमदाबाद येथील ‘गोल्ड किंग बायो जीन्स प्रा. लि.’ तसेच विक्रेता म्हणून ‘हायलंड हायब्रीड सीड्स’ यांचा उल्लेख आढळून आला. मात्र, संबंधितांकडे बियाण्यांच्या खरेदी, साठवणूक अथवा विक्रीसंदर्भातील कोणतेही वैध परवाने, बिले किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड झाले.

पुढील चौकशीत दीपक चौधरी याने गुलाब आधार पाटील, भूषण पाटील आणि तुकाराम कोळी यांच्या मदतीने ही बियाणे धरणगाव तालुक्यातील पिंपरी परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी बियाणे निरीक्षक राजू बळीराम ढेपले यांच्या फिर्यादीवरून दीपक राजमल चौधरी (रा. साईनाथ नगर, जामनेर), गुलाब आधार पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा), भूषण पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा) आणि तुकाराम कोळी (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर बियाण्यांच्या विक्री व साठवणुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले असून, शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत व प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यांनी केली कारवाई –

सदरची कार्यवाही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगांव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक प्रशांत दरेकर यांचे नेतृत्तवाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि प्रमोद वाघ, पोना हेमंत पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ राहुल महाजन या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हेही वाचा: उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: HTBT cotton seedsHTBT cotton seeds seizedjammer police stationmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page