मुंबई, 24 मे : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार होणार, याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, विद्यार्थी आणि पालकांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण, उद्या म्हणजे गुरुवारी 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
यावर्षी 13 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसले होते. या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली. उद्या गुरुवारी दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresults.nic.in वर जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल.
- या वेबसाईट्सवर चेक करू शकता निकाल
- असा चेक करा निकाल
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
- “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
- महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वीचा निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील वापरासाठी Save करा.
सर्व माहिती तपासून घ्या –
निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसेच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.