मुंबई, 7 नोव्हेंबर : मुंबईत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचा काल नारळ फोडण्यात आला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा असणारे ‘गॅरंटी कार्ड’ महाविकास आघाडीने जाहीर केले.
महाविकास आघाडीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा –
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा 3 हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याची घोषणा यावेळी राहुल गांधी यांनी केली. तर दुसरीकडे राज्यातील पाच जीवनाश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार असल्याचे शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच मोदींनी मागील दहा वर्षांत एकही गॅरंटी पुर्ण केली नाही असे म्हणत काँग्रेस हा गॅरंटी पुर्ण करणार पक्ष असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
शेतकऱ्याचे 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार –
महाराष्ट्र स्वाभिमान सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना लागू करून या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याचे 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. दरम्यान, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचेही पवार म्हणाले.
महाविकास आघाडीची महाराष्ट्राला पाच गॅरंटी –
- महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये. तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
- शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
- जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यास प्रयत्नशील.
- बरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंत मदत.
- 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधे.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला महायुतीचा जाहीरनामा सादर; शेतकऱ्यांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा