मुंबई, 13 जुलै : विधान परिषेदसाठी पार पडलेल्या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसला होता. मात्र, महायुतीने नव्याने रणनिती आखत सर्व जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीकडून 9 उमेदवार तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार यांनी निवडणुक लढवली. महायुतीतील भाजपचे 5, शिंदेसेनेचे 2, अजित पवार गटाचे 2 असे नऊ उमेदवार जिंकले. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (शरद पवार गट समर्थित) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची चर्चा आहे.
कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली ?
भाजप –
- पंकजा मुंडे- 26
- परिणय फुके-26
- अमित गोरखे- 26
- सदाभाऊ खोत- 23
- योगेश टिळेकर- 26
(अजित पवार गट) –
- शिवाजीराव गर्जे – 24
- राजेश विटेकर – 23
शिवसेना- (शिंदे गट) –
- भावना गवळी – 24
- कृपाल तुमाने – 25
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) –
- मिलिंद नार्वेकर – 24
काँग्रेस –
- प्रज्ञा सातव- 25
राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार गट समर्थित –
- जयंत पाटील, शेकप – 12
हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार