• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ‘असे’ आहेत कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 3, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ‘असे’ आहेत कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष

मुंबई, 3 जून: राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले सर्वात मोठे आश्वासन पूर्ण केले आहे. काल मंगळवारी (२ जून २०२६) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्ती मिळणार असून ६५ लाखांपेक्षा जास्त कर्ज खात्यांवरील ओझे कमी होणार आहे

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ –

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या ₹३६,५८५ कोटींच्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खरीप हंगामाच्या तोंडावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ वर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सरकारने याची थेट अधिकृत घोषणा करणे टाळले असले, तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेच्या मंजुरीसाठी विशेष सूट दिली आहे. ३० जून २०२६ पूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष:

  • 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी: ज्या शेतकऱ्यांचे मुद्दल आणि व्याजासह एकूण थकीत पीक कर्ज २ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल.
  • कर्जाचा कालावधी: १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज या योजनेसाठी पात्र असेल.”
  • नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन: प्रामाणिकपणे व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५०,००० पर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान थेट बँक खात्यात दिले जाईल.
  • वन टाईम सेटलमेंट (OTS): ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत भरावी लागेल. त्यानंतर उर्वरित २ लाख रुपयांची कर्जमाफी त्यांना लागू होईल. यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
  • पात्रतेच्या अटी: या योजनेसाठी कोणतीही जमीन धारणेची (जमिनीच्या आकाराची) अट ठेवलेली नाही. मात्र, सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, प्राप्तिकर (Income Tax) भरणारे नागरिक आणि २५ हजारांपेक्षा जास्त वेतन घेणारे सहकारी संस्थांचे कर्मचारी या योजनेतून वगळण्यात आले आहेत.
  • डिजिटल नोंदणी अनिवार्य: कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘ॲग्री स्टॅक’ (AgriStack) प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आणि आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे बंधनकारक असेल.

राज्याच्या तिजोरीवर २५,००० कोटींहून अधिक भार –

शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे २५,००० कोटी रुपयांचा थेट आर्थिक भार पडणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून (DCCB) घेतलेली कर्जे या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. ऐन मान्सून आणि खरीप पेरणीच्या तोंडावर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बँकांकडून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer loan waiverfarmer loan waiver criteriamahayuti governmentmarathi newsshetkari karjmafisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page