ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 जुलै : पाचोरा तालुक्यातील सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक ही बिनविरोध झाली. यामध्ये महेंद्र मोतीलाल साळुंखे यांची सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच पूनम राजेंद्र साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त जागेवर महेंद्र साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसपंचपदासाठी महेंद्र साळुंखे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता भोलेनाथ भिल या होत्या. तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील, रविंद्र साळुंखे, पूनम साळुंखे, मालुबाई पाटील, मनिषा पाटील, आदी. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले. महेंद्र पाटील यांच्या बिनविरोध उपसरपंचपदी निवडीनंतर तुळजाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डी. एम.पाटील यांच्यासह भोलेनाथ भील, साहेबराव पाटील, भालचंद्र चव्हाण, राजेंद्र साळुंखे, मुकेश सोनकूळ, यशोदीप पाटील, सुनील साळुंखे, प्रशांत साळुंखे, प्रमोद पाटील, बाळकृष्ण साळुंखे, शिवाजी चव्हान, मकरंद पाटील, प्रशांत सूर्यवंशी, ऋषिकेश नेरपगार यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.