• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मंगेश चिवटेंकडे राज्यातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी; एकनाथ शिंदेंनी वाढदिवसानिमित्त केली घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मंगेश चिवटेंकडे राज्यातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी; एकनाथ शिंदेंनी वाढदिवसानिमित्त केली घोषणा

ठाणे, 10 फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली असून या वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न राहणार असल्याने गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा मिळणार आहे, असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, आदी उपस्थित होते.

मंगेश चिवटेंकडे जबाबदारी –
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे देण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मंगेश चिवटे प्रमुख असताना या कक्षातून तब्बल 419 कोटी निधी वितरित केला गेला होता. परिणामी 51 हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचविण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला यश आले. दरम्यान, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होताच आता पुन्हा एकदा मंगेश चिवटे यांच्याकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

File Photo
File Photo

कोण आहेत मंगेश चिवटे? –
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मंगेश चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख होते. त्यावेळी त्यांनी आरोग्य निधी गरजूपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी उत्तमरित्या सांभाळली होती. तत्पूर्वी, कोरोना महामारिच्या काळात मंगेश चिवटे यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना आरोग्यदूत म्हणून संबोधले गेले. यासोबतच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनावेळी सरकारच्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश होता.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm medical relief celleknath shindemangesh chivatemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page