बीड, 12 ऑक्टोबर : दसऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधवाची उपस्थिती त्याठिकाणी पाहायला मिळाली. उपस्थित की, एक गोष्ट लक्षात ठेवा. शेवटी आपल्यापुढे पर्याय नाहीये. मुख्य भूमिका तुम्हाला घ्यावीच लागणार आहे आणि म्हणून आचारसंहितेनंतर तुम्हाला मुख्य भूमिका सांगणार असल्याचे मनोज जरांगे पाटील मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? –
मनोज जरांगे पाटील सरकारवर निशाणा साधत पुढे म्हणाले की, यांनी आपल्याला फसवलयं आणि आता आपल्यापुढे एकच पर्याय. तो म्हणजे आचारसंहिता लागू द्यायची. मी तुम्हाला नारायण गडावरून सांगतो, सरकारला सांगतो… सरकार… ओय सरकार… सुट्टी नाही भाऊ, आचारसंहिता लागायच्या आत राज्यातील प्रश्नाची अंमलबजावणी करायची. नाही केली तर आचारसंहिता लागल्यावर सांगेल ते करायचं, असे म्हणत त्यांनी दंड थोपटले.
मला संपवण्याचा घाट घातलाय –
मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, यांना उखडून फेकावेच लागणार आहे. यांची सुट्टी नाही. आपल्यावर डोळ्यादेखत अन्याय करत असेल तर समोरच्याला उखडून फेकावेच लागेल. त्याशिवाय त्यांची सुट्टी नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावे लागेल, असेही जरांगे म्हणाले. तसेच मला पूर्ण घेरले आहे. मला संपवण्याचा घाट घातला आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत