• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 29, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

जालना, 29 ऑगस्ट: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदींच्या आधारे तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, महाराष्ट्रातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, तसेच आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबीयांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे लढा देत असून आता माघार घेण्याची वेळ नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. हा अखेरचा लढा आहे,’ असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

सरकारने सर्व प्रश्न वेळेत सोडवावेत –

सरकारने मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, असे आवाहन करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले. ‘आज सरकारशी गोडीने बोलत आहोत; मात्र उद्या परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे सरकारने सर्व प्रश्न वेळेत सोडवावेत,’ असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच अजित पवार यांचाही उल्लेख केला. मात्र, नंतर आपल्या वक्तव्याचा खुलासा करताना अजित पवार यांचा उल्लेख अनावधानाने तोंडून झाल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचे निधन झालेले असल्याचे लक्षात आल्यानंतरही त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने, ‘अजितदादा गेल्यासारखे वाटतच नाहीत, त्यामुळे तोंडातून त्यांचे नाव आले,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

आता घरात बसून चालणार नाही. मुंबई असो किंवा अंतरवली सराटी, मराठा समाजाने वेळ मिळेल तसे आंदोलनात सहभागी व्हावे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आपल्या लढ्यामुळे पुढील पिढ्यांचे कल्याण होणार असल्याचे सांगत त्यांनी समाजाला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.

दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परतावा देण्याची मागणीही त्यांनी केली. सर्व प्रलंबित लाभ एकाचवेळी देण्यात यावेत, अशी मागणी करत ‘आता वाट पाहायची नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: antarwali saratihunger strikemanoj jarange patilmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

August 28, 2026
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

August 28, 2026
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून 13 हजार 119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून 13 हजार 119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

August 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page