पुणे, 23 जानेवारी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईकडे रवाना झाला आहे. दरम्यान, हा मोर्चा पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात असताना मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. आमच्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका तसेच मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, आणि हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघा, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे? –
मनोज जरांगे म्हणाले की, ” मराठा समाज बांधव एकत्रित आहेत, तरीही त्यांच्या लक्षात येत नाही. हे आंदोलन किती गांभीर्याने घ्यायचे हे त्यांच्या लक्षात येत नाही. शब्द दिल्यामुळे त्यांना यायला लाज वाटत असेल, त्यामुळे सरकारने शहाणपण घेतले तर बरे राहील.
एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही –
समाजाला वेड्यात काढनं सोडावे. आरक्षण मिळाले तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत. तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, हेही चॅलेंज बघायचे असेल तर बघावे, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगेंच्या विरोधात याचिका –
मनोज जरांगे यांना मुंबई येण्यापासून रोखा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. दरम्यान, या याचिकांची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्यायमूर्ती रेवते मोहिते-डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने 24 जानेवारील सुनावणी निश्चित केली. त्यामुळे या सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : मी कारसेवक होऊ शकलो नाही मात्र रामसेवक होण्याचे भाग्य मला मिळाले, आमदार किशोर पाटील यांचे प्रतिपादन