• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Manoj Jarange : ‘…तर मी सोडणार नाही!’, मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 9, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Manoj Jarange : ‘…तर मी सोडणार नाही!’, मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

जालना, 9 फेब्रुवारी : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मोठी बातमी समोर आली आहे. जालना पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केलीय. यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील पाच जणांचा समावेश आहे. यावरून जरांगे चांगलेच संतापले असून त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय.

मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा –
मुख्यमंत्री तसेच सुरेश धस यांनी एकीकडे सांगायचं की, आम्ही गुन्हे मागे घेणार आहोत असे तर दुसरीकडे नोटीस पाठवायच्या. एकीकडे म्हणायचे गुन्हा मागे घेतो आणि दुसरीकडे गुन्हे वाढवायचेत खरंतर, तुम्ही अंतरवालीतील मराठा आंदोलकांना नोटीसा देणार असाल आणि त्यांच्या पाठीमागे असे लागणार असाल तर मी सोडणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. प्रामाणिकपणे आंदोलन करणाऱ्याला तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत, असेही जरांगे म्हणाले आहेत.मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मराठा आंदोलन म्हणून तुम्ही जर नोटीस देणार असाल तर अंतरवालीच नाही तर राज्यात कोणीही हे सहन करणार नाही. मला बदनाम करण्यासाठी एखाद्या वेळेस पाहुणे-रावळे घेतले असतील त्यांनी माझी बोलती बंद करण्यासाठी हे षडयंत्र असू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ धनंजय मुंडेंसारखी टोळी आहे. दरम्यान, एखादा मुद्दा मी उचलू नये म्हणून पाहुणेरावळे काढले आहेत. पण मला कोणी पाहुणा नाही, मराठा समाजासाठी मी आई-वडील सुद्धा घरी ठेवले आहेत. मी फक्त मराठा आंदोलक आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत.15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण –
मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांची अंमलबजावणी न केल्याने मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी याबाबतची घोषणा केलीय. दरम्यान, मुंबईतही जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय. दोन तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाची पाहणी करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisjalnamanoj jarangemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

April 24, 2026
बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल; उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा

बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल; उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा

April 23, 2026
नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

April 23, 2026
वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

April 22, 2026
‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 22, 2026
महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

April 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page