• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 6, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

मुंबई, 6 ऑगस्ट : बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य –
बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया जलद करणे याअनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली आहे.

राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन –
बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधण्यास आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य –
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे.

हेही वाचा : “……शक्य करणं हीच माझी ओळख”, लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना प्रत्यत्तर

बातमी शेअर करा !
Share
Tags: bangladesh voilencecm eknath shindeshaikh hasinasuvarna khandesh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

September 12, 2026
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page