चाळीसगाव, 27 एप्रिल : चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भुजल अभियान अंतर्गत गुणवंत सोनवणे यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली व सुचित्रा पाटील यांचे प्रयत्नातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ब्राम्हणशेवगे येथील पाझर तलावातील सुपिक गाळ, माती शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून घेणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच देवळी येथे नाला खोलीकरण, बांधबंदीस्ती,गाळ टाकणे, शिवार,पांधन रस्ते करणे, तसेच सेवा सहयोग फाऊंडेशनचे तालुक्यातील सुरु असलेल्या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भुजल अभियानाचे भुजल वारकरी सोमनाथ माळी यांनी जलसंधारण कामांचे महत्व तसेच संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. बैठकीला ब्राम्हणशेवगे येथील संजय बाविस्कर, बाबासाहेब बाविस्कर, जिभाऊ नेरकर, भैय्यासाहेब बाविस्कर,देवळी येथील उपसरपंच छगन जाधव, संजय जाधव, दिलीप पाटील, नाना पाटील, जगन्नाथ शिंपी, मच्छिंद्र पाटील, गोपाळ साबळे, दगडू कोळी, जिभाऊ पाटील, मुरलीधर पाटील, दत्तू हडपे, रामदास पाटील, राहूल पाटील, शुभम रणदिवे, पद्माकर पाटील, तोताराम पाटील, मनोहर पाटील, शिवाजी पाटील, रोहिदास पाटील, सुनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप पाटील, स्वप्नील पाटील व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा : सूर्य आग ओकतोय, जळगावचे तापमान महाराष्ट्रात सर्वात जास्त, पुढचे तीन दिवस आणखी महत्त्वाचे..