जळगाव, 18 डिसेंबर : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे जळगावात आगमन झाले आहे. यानंतर जिल्ह्यातील अनेक नेते मंडळींसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्यांच्या भेटीला येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सुरेश दादा जैन यांची भेट घेतली. यानंतर काल शनिवारी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही सुरेशदादा जैन यांची भेट घेतली.
मंगेश चव्हाण यांनी ट्विटमध्ये काय म्हटले –
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरेशदादा जैन यांनी भेट घेतली. यानंतर त्या भेटीसंदर्भात ट्विटही केले. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, “प्रदीर्घ काळानंतर जिल्ह्याचे नेते, माजीमंत्री श्री. सुरेशदादा जैन यांचे जळगाव येथे आगमन झाले आहे. आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाऊ यांच्यासोबत आदरणीय दादांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
प्रदीर्घ काळानंतर जिल्ह्याचे नेते, माजीमंत्री श्री. सुरेशदादा जैन यांचे जळगाव येथे आगमन झाले आहे. आज ग्रामविकास मंत्री ना.श्री.@girishdmahajan भाऊ यांच्यासोबत आदरणीय दादांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. (1/2)#सुरेशदादा pic.twitter.com/ZYJ0lQcVur
— Mangesh Chavan (@mlamangeshbjp) December 17, 2022
त्यावेळी दादांनी देखील जिल्हा दूध संघ निवडणुकीत मी विजयी झाल्याबद्दल माझा सत्कार केला व आशिर्वाद दिले. सामाजिक, राजकीय जीवनात दादांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत राहिले आहे”,असे ट्विट मंगेश चव्हाण यांनी केले.
दरम्यान, साडेतीन वर्षांनी सुरेशदादा जैन यांचे जळगावात आगमन झाले आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ते पूर्णवेळ शिवाजीनगर येथेच थांबणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश भोळे यांनीही सुरेशदादा जैन यांची भेट घेतली.