• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त, मंत्री गिरीश महाजन यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, प्रशासनाला दिले महत्वाचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 26, 2024
in जळगाव जिल्हा, जामनेर, ताज्या बातम्या
वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त, मंत्री गिरीश महाजन यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, प्रशासनाला दिले महत्वाचे आदेश

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जामनेर (जळगाव), 26 मे : जळगाव जिल्ह्याच्या काही भागात काल शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले असून राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातील मतदारसंघातील देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा काकर, गोरनाळा येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना मंत्री महाजन म्हणाले की, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, राहत्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा अक्षरशः झोपल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची छते उडून गेली असून, घरांची पडझड झाली आहे. मात्र, जीवित हानी कुठेही झालेली नाही.

नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश –
मंत्री महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी, तहसिलदार आणि कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही जणांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली असून त्यांना लवकरच आर्थिक स्वरूपाची देखील मदत देण्यात येईल, असेही मंत्री महाजन म्हणाले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तापमानाने उच्चांक केलेला असून नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले.

केळी बागांचे नुकसान –
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने केळी बागा होरळपत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले. रावेर तालुक्यात 15 ते 16 गावांमध्ये केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वादळामुळे हिरावला गेला. तसेच घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, केळी बागांना अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांचे नुकसान

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsminister girish mahajanunseasonal rainअवकाळी पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

April 25, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

April 25, 2026
जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

April 25, 2026
विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 25, 2026
पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

April 25, 2026
राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

April 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page