चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा/मुंबई, 28 मे : मुंबईत पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल 27 मे रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, विधानसपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान, या पक्षप्रवेशप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी पाचोरा भाजपचे अमोल शिंदे यांचा उल्लेख केला.
मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? –
दिलीप वाघ यांच्या पक्षप्रवेशप्रसंगी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून दिलीप वाघ यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा सुरू असताना असं ठरलं होतं की, मुहुर्त निघत नाही म्हणून पक्षप्रवेश जळगावलाच करून टाकू. पण नाही…वाघ म्हटल्यावर वाघासारखाच प्रवेशही झाला पाहिजे. म्हणून मुंबईत हा प्रवेश होत आहे.
पाचोरा-भडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ –
दरम्यान, दिलीप वाघ होते म्हणून पाचोरा-भडगावमध्ये राष्ट्रवादी होती. मात्र, दिलीप वाघ हे भाजपात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. आणि आज आम्हाला आनंद होतोय की ते स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात आले आहेत. म्हणून मी त्यांचे स्वागत करतो आणि पक्षात त्यांचे अभिनंदन करत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन यांनी केला अमोल शिंदेंचा उल्लेख –
आता पुढे चार महिन्यांनी नगरपालिका, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूका आहेत आणि या निवडणुका एकहाती जिंकायच्या आहेत. यामध्ये कुठलीच जागा सोडायची नाही. आज अमोल शिंदे याठिकाणी नाहीयेत. पण आताच मी त्यांच्यासोबत फोनवर बोललो. त्यांना उशिरा निरोप गेला. म्हणून अमोल शिंदे, मधूकर काटे आणि सर्वांनी मिळून ठरवलं तर पंचायत समिती-जिल्हा परिषदेत खातेसुद्धा कोणाला उघडता येणार नाही. चाळीसगाव, जामनेर, पाचोरा अशा तीन चार तालुकांनी जर ठरवलं तर 100 टक्के बहुमत आपलं त्याठिकाणी होणार आहे.
View this post on Instagram
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकाहाती ताब्यात घ्यायच्या आहेत. असून असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान, दिलीप वाघ यांच्या पक्षप्रवेशामुळे निश्चितच पक्षाला मोठी ताकद मिळालेली आहे. म्हणून गट-तट न करता कुठलाही वादविवाद न करता सर्वांनी मिळून-मिसळून काम करायचे आहे. दरम्यान, दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे त्यांच्या अपेक्षाला अजिबात तडा जाऊन देणार नाही, अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.