जळगाव, 18 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात सध्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा नार-पार गिरणा प्रकल्पावर माहिती देत नार-पार ही योजना कुठल्याही परिस्थितीत पुर्णत्वास येणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
जिल्हा नियोजन भवनात काल आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “वर पण (केंद्र सरकार) आम्ही आणि खाली पण (राज्य सरकार) आम्ही असे म्हणत त्यांनी राज्यात आणि केंद्र महायुतीचे शासन असल्याचे सांगितले. त्यामुळे नार- पार योजना कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास येईल, असा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
विरोधकांवर टीका –
राज्यपालांनी नार पार प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याचे पत्र स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले. तसेच जळगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः याबाबत सांगितलंय. आणि असे असताना नार पार बाबत विरोधकांकडून बाशी कढीला उत दिला जात असल्याची खोचक टीकाही यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली.
हेही वाचा : रक्षाबंधनाचे औचित्य, आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे मतदारसंघातील महिलांसाठी अनोखी भेट