चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 10 मे : आम्ही संविधान तर बदलवणार नाहीच, पण 80 वेळा ही घटना तोडण्याचे पाप हे कुणीजरी केले असेल तर हे काँग्रेसेने केले आहे. याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जळगावातील जाहीरसभेत बोलत होते.
काय म्हणाले मंत्री नितीन गडकरी? –
केशवानंद भारती यांच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा दाखला देत मंत्री गडकरी म्हणाले की, सुप्रिम कोर्टात केस आली होती. त्यांनी आपल्या देशाच्या घटनेचे मुलभूत तत्व कुठल्याही सरकारला किंवा राष्ट्रपती वा पंतप्रधानांना ते बदलाता येऊ शकत नाही. पण घटनेचा ब भाग जो त्याला बदलता येतो. मला तुम्हाला सांगताना दुःख होत आहे की, आम्ही तर संविधान तर बदलवणार नाहीच, पण मात्र, 80 वेळा घटना बदलवण्याचे काम काँग्रेसने केले आहे.
विरोधकांकडून आमचा अपप्रचार –
मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजातील बांधवांपर्यंत विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. ते त्यांना सांगतात की तुम्हाला कापून टाकतील, तुम्हाला पाकिस्तानाला पाठवून देतील. अशावेळी आमच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवित असताना कुणालाही सरकारच्या योजनांपासून वंचित ठेवले नाही, कारण आमचे ध्येयच आहे की, सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास. आम्ही सगळ्या योजना सगळ्यांकरिता केल्या. कुठलाही माणूस गरीब गरीब असतो, तो कुठल्याही जात वा धर्माचा याठिकाणी संबंध नसतो. असे असताना मात्र विरोधकांकडून आमचा अपप्रचार केला जात असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.
स्मिता वाघ यांच्यात लोकांचे प्रश्न मांडण्याची ताकद –
देशाचे भविष्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक ही निवडणूक आहे. तुमचा भविष्यकाळ चांगला करायचा असेल. शेतकऱ्यांना समृद्ध, सिंचनासाठीच्या योजना, बेरोजगारी तसेच गरिबी यावर यशस्वीपणे काम करायचे असेल तर यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार. नाहीतर मग धोकाच आहे, असे मंत्री गडकरी म्हणाले. तसेच स्मिता वाघ यांच्यात लोकांचे प्रश्न मांडण्याची ताकद आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
समाज बदलणे आमचे स्वप्न –
सगळ्यांनी गरीबी हटावचा नारा दिला आज अशी परिस्थिती आहे की, 75 वर्षांच्या या स्वाधीनतेच्या इतिहासात साठ वर्ष मिळून काँग्रेस जे काम करू शकले नाही ते मागील दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात आमच्या सरकराने करून दाखवल ते तुमच्यासमोर आहे. केवळ मंत्री, आमदार किंवा खासदार बनणे आमचे स्वप्न नाहीये तर समाज बदलणे आमचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अरविंद देशमुख यांच्या महायुतीतील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींची शरद पवारांना खुली ऑफर! नंदुरबारातील सभेत नेमकं काय म्हणाले?