जळगाव – बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही. सगळ्यात आधी जर कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही. सगळ्यात आधी जर कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो, असे म्हणत मंत्री संजय सावकारे यांनी आधी केलेल्या आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
संजय सावकारे यांनी पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात दिलेल्या प्रतिक्रियेवर सर्वत्र टीका केली जात होती. मंत्री संजय सावकारेंनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणीही केली होती. दरम्यान आता मंत्री संजय सावकारेंनी यांनी आपल्या वक्तव्यामुळे कुणाची मनं दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो, असे म्हटले आहे.
काय म्हणाले होते मंत्री संजय सावकारे –
भंडारा येथे माध्यमांशी बोलताना मंत्री संजय सावकारे म्हणाले होते की, एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही. देशात म्हणाल तर, घटना या घडतंच असतात. त्याच्यावर कारवाई सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष, प्रत्येक जण सुरक्षित राहायला हवा. महिला, पुरुष सगळे सुरूक्षित राहायला हवेत, यादृष्टीने कुठलंही शासन असो, हे प्रयत्न करत असते. गुन्हेगारी वृत्ती हे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे असते. गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतंच असतात. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम हे शासन करत असतं, या शब्दात मंत्री संजय सावकारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मंत्री संजय सावकारेंनी मागितली माफी –
दरम्यान, आज याबाबत माफी मागत मंत्री संजय सावकारे म्हणाले की, बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही. सगळ्यात आधी जर कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश्य नव्हता. सन्माननीय पत्रकाराने जे दाखवलं त्याच्याआधी त्यांनी मला बोलले की, तुमचं सरकार आल्यापासून महिलांवर अत्याचार वाढले आहेत. म्हणून मी ते बोललो. त्याचा विपर्यास केला गेला. तरी माझ्या वाक्याने कुणाची मने दुखावली असतील तरी माफी मागतो. माझा असा कुठलाही उद्देश्य नव्हता. उ’, असे मंत्री संजय सावकारे म्हणाले.
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर याप्रकरणातील आरोपीला आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या शोधासाठी 13 पथके तैनात करण्यात आली. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहे. तसेच तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आता आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.