ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर, (पाचोरा) : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील स्वारगेट येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच आता पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा संताजनक प्रकार घडला.
बादल नामदेव चांदे, असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पिंपळगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरत आरोपीला अटक केली आहे. तसेच आज सकाळी त्याला जळगाव न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला सब जेल येथे रवाना केले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवा 26 फेब्रुवारीला बुधवारी रात्री सव्वा आठवाजेच्या सुमारास आरोपीने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील अल्पवयीन पीडित मुलीचा उजवा हात धरुन तिला त्याच्या उजव्या हाताने हातवारे करुन, इशारा करुन, विनयभंग केला. यानंतर पीडितेचे काका समजावण्यास गेले असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
याप्रकरणी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी बादल नामदेव चांदे (वय-19, रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) याचा पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन त्यास अटक केली. आरोपीविरोधात गु.र.न. 43/2025, भारतीय न्याय संहिता कलम 74, 352, 351 (2 (3) सह पोक्सो कायदा सन 2012 चे कलम 12, 17 अन्वये पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्दा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे पाचोरा, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर यांच्या सूचनेवरुन पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे यांनी केली.
हेही वाचा – minister sanjay savkare : ‘त्या’ वक्तव्यावरुन मंत्री संजय सावकारेंनी मागितली माफी, म्हणाले…