नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला जात आहे. यामध्ये ‘सुवर्ण खान्दश लाईव्ह’ने धुळे शहर मतदारसंघाचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक विषय असून वक्फ बोर्डच्या माध्यमातून कोट्यवधींच्या जमिनी लाटल्या जातायेत. त्यामुळे वक्फ बोर्डाची समिती बरखास्त करुन तिला सर्वसमावेशक करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच त्यांनी आगामी काळातील आपल्या मतदारसंघाचे व्हिजनही सांगितले.