• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मुक्ताईनगर

मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : आमदार चंद्रकात पाटलांनी दाखवले आरोपी अन् खडसे कुटुंबीयांचे फोटो; म्हणाले, तो आधी भाजपमध्ये…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 2, 2025
in मुक्ताईनगर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
MLA Chandrakant Patil showing a photo of the accused with Eknath Khadse and Raksha Khadse at a press conference.

पत्रकार परिषदेत आरोपीचे एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंसोबत फोटो दाखवताना आमदार चंद्रकांत पाटील.

मुक्ताईनगर : मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पीयूष मोरे हा शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोपी पीयूष मोरे यांचे एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांच्यासोबतचे फोटोच पत्रकार परिषदेत दाखवले.

या सर्व गुडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय असा आरोप एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केला होता. आरोपींमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिंदे गट वगैरे असे काही नसतं. संस्कार करताना आम्ही संस्कार चांगले करत असतो. एखाद्या नातेवाईक वगैरे जोडून आमच्यापर्यंत पोहोचायचं झालं तर खडसे आणि माझे आजपर्यंतचे जे वाद आहेत, त्यातून काही लोक आमच्याकडे अंगुलीनिर्देश केलं जात आहेत. ही मंडळी पूर्वी यांच्याकडे होती. म्हणजे पीयूष महाजन म्हटल्यावर भाजपकडून निवडून आलेला आहे ना आणि रक्षाताईंनी त्यांना जो फोन केला होता, ती जी क्लीप व्हायरल झाली, तो आत्मीयतेनेच केला आहे ना, काहीतरी संबंध आहे म्हणूनच केला ना, त्यामुळे कार्यकर्ता कोण आहे, हे महत्त्वाचं नाही, कोणत्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही, विषय डायव्हर्ट करण्यापेक्षा त्यांनी जर छेडखानी केली असेल, तर त्याच्यावर तत्काळ कठोर कार्यवाही झाली पाहिजे, असं आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

संशयितांचे फोटो हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दिसून आले आहेत. याबाबत ते म्हणाले की, खडसे साहेबांसोबतचे फोटो देऊ का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. एका मिनिटात खडसे साहेबांसोबतचे फोटो देतो. आम्ही राजकारणी, आमच्यासोबत कुणीही येतं, फोटो काढतं, आम्ही त्याला नाही म्हणू शकतो का, आता लग्नात गेलं की लग्नात फोटो काढायचं सांगितल्यावर त्यांना आपण नाही कसं म्हणणार. असे अनेक नेत्यांबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. याचा अर्थ असा होतो का, असं म्हणत कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यामुळे तो एक मेसेज जाईल की, तो कितीही मोठा असला तरी जो अशा मुलींची किंवा आयाबहिणींची छेड काढेल किंवा महिलांना असुरक्षित करत असेल अशा प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

आमदार चंद्रकांत पाटलांनी दाखवले ते दोन फोटो – 

दरम्यान, या प्रकरणात पीयूष मोरे या कार्यकर्त्याचं नाव समोर आले आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, पीयूष मोरे हा भाजपचा नगरसेवक निवडून आला आणि नंतर तो आमच्या पक्षात आला. दोन वर्षांपूर्वीचा हा विषय आहे. आधी तो भाजपमध्ये निवडून आला आणि नंतर त्याने माझ्याकडे प्रवेश केला. बहुतांश वेळ तो भाजपमध्ये होता. आजही रक्षाताईंबरोबर त्यांचे फोटो आहेत. खडसे साहेबांबरोबर त्याचा फोटो आहे, असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पीयूष मोरे आणि एकनाथ खडसे यांचा फोटो दाखवला.

व्हायरल ऑडिओ क्लीपबाबत आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी पीयूष मोरेसोबत केलेली चर्चा ही आपुलकीच्या भावनेतूनच आहे ना. माझे तुझ्यावर उपकार आहेत, अशा पद्धतीची ती क्लीप मी ऐकली आहे. म्हणजे त्यांचे कुठेतरी संबंध होते. तसेच या प्रकरणात जे कुणी असतील, त्यांना मी सोडणार नाही, असंही त्या म्हणाल्या. पण सोडणार नाही यापेक्षा, असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पीयूष मोरे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा फोटो दाखवला.

पण तुम्ही जर ती क्लीप व्यवस्थित ऐकली तर पीयूष मोरे नंतर तिथे पोहोचला. तो सांगतो की, असं काही झालेलं नाही. जे झालं त्यासंदर्भात पोलीसला सांगतो की, तु तक्रार दाखल कर, असं मी त्या क्लीपमध्ये ऐकलं. त्याने छेडखानी केली, असं त्यात कुठे बोलणं झालं. अशा पद्धतीची त्यात चर्चा आहे का, तरी तो आरोपी झाला. उद्या याबाबत तपासात काय आहे ते निष्पन्न होईल.

खडसे साहेबांना जास्त गंभीर घेण्यात काही अर्थ नाही. शेवटी ते खडसे साहेब आहेत. कुणाच्याही विरोधात काहीही बोलायचं आणि माझं आणि त्यांचं तर खूप सख्य आहे. 137 कोटी त्यांच्या इतके जिव्हारी लागले की, कुटूंब डिस्टर्ब आहे. त्यांना सगळीकडे आमदारच दिसत आहेत. जी घटना घडली, त्या घटनेबाबत बोलावे, जे दोषी असतील त्याबाबत बोला, पण त्यांना कठोर कारवाई किंवा कठोर शासन झालं पाहिजे, तर बोला. आरोपींना कोण वाचवत आहे, हे तर दाखवा.

टाळूवरचे लोणी खाण्याची यांची सवय –

आमच्या घरातही आई-बहिणी आहे. मुली आहेत. प्रत्येकाला मुली आहेत आणि प्रत्येकाची महिला, भगिनी संदर्भातील संवेदनेची बाजू असते. ते प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. फक्त आरोप करायचा, एखाद्याला बदनाम करायचे, टाळूवरचे लोणी खाण्याची यांची सवय जाणार नाही, असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार निशाणा साधला.

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath khadsemla chandrakant patilmuktainagar crimemuktainagar latest newsmuktainagar newsmuktainagar policeraksha khadseraksha khadse latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page