ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 नोव्हेंबर : “निंभोरा येथील शहीद जवानाला मी अंतिम निरोप देण्यासाठी गेलो. त्याप्रसंगाची शूटिंग काढली आणि त्या व्हिडिओत शिवसेना, कमळ आणि घड्याळ अशी चित्र लावत फेरफार करुन ट्रोल करण्याचा प्रयत्न करताएत. अरे..मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना ही जनता कधीही माफ करणार नाही,” असा घणाघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विरोधकांवर लगावला. एखाद्या शहीद जवानावर राजकारण करण्यापेक्षा हिंमत असेल तर समोर या, असे खुले आव्हानही आमदार पाटील यांनी विरोधकांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाचोऱ्यात आयोजित केलेल्या जाहीरसभेत ते बोलत होते.
आमदार किशोर आप्पांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन –
पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ यांच्या महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्त तसेच मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
महायुती सरकारने अडीच वर्षांत घेतलेल्या निर्णयाने समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. नारी शक्तीचे सन्मान करण्याचे काम महायुती सरकारने केले असल्याचेही आमदार पाटील म्हणाले. मी स्वप्नात देखील पाहिले नव्हते…इतकी 3 हजार कोटी रुपयांची कामे मतदारसंघात करण्यात आली. मात्र, माझ्या विरोधकांना मतदारसंघात झालेली विकासकामे दिसत नसल्याने 20 तारखेनंतर मोफत मोतीबिंदुचे शिबिराचे आयोजन करणार आणि या शिबिरात या सगळ्यांचे ऑपेरेशन करणार असून मोफत चष्मा देण्याचे काम करणार आहे आणि यानंतर मी केलेली विकासकामे त्यांना दाखवणार असल्याची मिश्किल टिप्पणी आमदार पाटील यांनी केली.
मतदारसंघात 15 सबस्टेशन मंजूर करण्यात आले. यासोबतच गिरणा नदीवर सात पुले बांधण्याचा प्रयत्न केला. तसेच मतदारसंघातील बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडविण्यासाठी 250 हेक्टरवर एमआयडीसी मंजूर केली असून येत्या वर्षभराच्या आत याठिकाणी मोठे उद्योगधंदे आणण्याचे काम करणार असल्याचेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. याच मतदारसंघात 100 करोड रुपयांची सुतगिरणी मंजूर केली आणि यामाध्यमातून 2 हजार बेरोजगार तरुणांना काम देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, जलयुक्त शिवार तसेच जलसंधारणाच्या माध्यमातून 300 बंधारे बांधल्याने शेतकऱ्यांना याची मदत झाली असल्याचेही ते म्हणाले.
भडगावला दिली नवी ओळख –
एकवेळ अशी होती की पाचोरामुळे भडगाव ओळखले जात होते. मात्र, महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे की, या जिल्ह्यात तीन आरटीओ कार्यालय आहेत. आणि याच जिल्ह्यातील भडगाव तालुक्याला आरटीओ कार्यालय मंजूर केल्यामुळे MH-54 अशी नवी ओळख मिळाली असून देशाच्या नकाशावर आले आहे.
विरोधकांवर जोरदार टीका –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोऱ्यातील सभेत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात माझे 12 विरोधक आहेत..आणि सातत्याने माझ्यावर टीका केली जातेय. खरंतर, मी केल्या कामांमुळे विरोधकांना माझ्यावर बोलायला काहीच सापडत नाही. यामुळे ज्या-ज्या ठिकाणी माझ्या सभा पार पडत असतात..त्या-त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने मोबाईलमध्ये चित्रकरण (शूटिंग) करुन फोटो आणि व्हिडिओत फेरफार करुन मला अडचणीत आणण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी विरोधकांवर केला. तुमच्या आयुष्यात एक मुतारी तुम्ही बांधली नाही आणि किशोर आप्पांवर तुम्ही आरोप करताएत, असेही आमदार पाटील म्हणाले.
पाचोरा भडगाव तालुका समृद्ध होणार –
मी महायुती सरकारचे आभार मानेन की, जळगाव जिल्ह्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांनी नार-पार योजनेला 7 हजार करोड रुपयांची मंजुरी दिली. खरंतर, या योजनेमुळ गिरणा नदी धो-धो वाहणार आहे. पण त्या गिरणेतील पाणी अडविण्यासाठी मला पक्के बंधारे बांधण्याचे प्रयत्न करायचे आहेत. आपल्या सगळ्यांच्यावतीने याबाबतची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले. दरम्यान, ज्या दिवशी पक्के बलून बंधारे बांधले जातील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने पाचोरा भडगाव तालुका समृद्ध होणार आहे, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
“मला विजयी करुन हॅट्रिकच्या इतिहासाचे शिल्पकार व्हा” –
मी आजपर्यंत पाचोरा-भडगाव तालुक्याचा एक वेगळा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीकोनातून उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही काही करायचे आहे. यामुळे येत्या 20 तारखेला ..माझी निशाणी ही धनुष्यबाण असून आणि क्रमांक एक आहे. यामुळे तुम्ही विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपण सगळ्यांनी मला प्रचंड अशा मतांनी विजयी करुन या हॅट्रिकच्या इतिहासाचे शिल्पकार व्हा, असे आवाहन आमदार पाटील यांनी उपस्थितीतांना केले.
यांची होती उपस्थिती –
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप केदार यांनी तर आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक तथा गांधीनगरचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल, खासदार स्मिता वाघ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील तालुका प्रमुख सुनील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे,जि.प. माजी सदस्य विकास पाटील, डी. एम. पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, बाजार समिती सभापती गणेश पाटील उपसभापती पी.ए.पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शशिकांत येवले,भाजपचे विधानसभा संयोजक अमोल पाटील, तालुका सरचिटणीस अनिल पाटील,संजय गोहील, सुनीता पाटील, युवती सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ प्रियंका पाटील,युवा नेता सुमित पाटील, शिवसेनेचे भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील,भडगाव शेतकी संघाचे भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय चौधरी, बबलू देवरे, युवराज पाटील,किशोर संचेती प्रा. चंद्रकांत धनवडे,नंदू पाटील, राजेश पाटील,समाधान पाटील,प्रवीण पाटील,शहर प्रमुख सुमित सावंत शरद पाटे युवासेनेचे लखीचंद पाटील, जितेंद्र जैन,समाधान पाटील, सुधाकर पाटील,जगदीश पाटील, सुनील पाटील,रवींद्र पाटील,प्रमोद सोमवंशी,अविनाश कुडे, इंदल परदेशी, हेमंत चव्हाण बापू हटकर,भाजपच्या रेखा पाटील,महिला आघाडीच्या सौ नंदा पाटील, मायाताई केदार उपस्थित होते.
हेही वाचा : किशोर आप्पा पाटील यांची हॅट्रिक होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार? ‘असा’ आहे 1962 पासूनचा इतिहास