मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी राज्यभरातील आमदार आपापल्या मतदारसंघातील प्रश्न विधिमंडळात मांडत आहेत. यातच आज पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला.
काय म्हणाले किशोर आप्पा पाटील?
आमदार किशोर आप्पा पाटील हे आज विधानसभेत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात आपल्या युतीच्या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं जे व्याज होतं, ते व्याज 3 लाखांपर्यंत माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. परंतु दुर्दैवाने 2022-23 साली आणि 2023-24 मध्ये जळगाव जिल्ह्यातील जवळपास 23 हजार शेतकऱ्यांचं 7 कोटी 55 लक्ष रुपये व्याज हे केंद्र सरकारकडून बँकेला परतावा न आल्याने जळगाव जिल्हा बँक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करत आहे.
संबंधित सहकार मंत्री यांना आपण सूचना द्याव्यात की, की 23 हजार शेतकरी बांधवांचे 7 कोटी 55 लक्ष रुपये म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ते नुकसान होऊ नये, याची काळजी घ्यावी राज्य सरकारने घेऊन केंद्र सरकारकडे पाठवावी, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली.
तसेच जिल्हा बँक जेव्हा ते सर्व पाठवत आहे, तर ते पोर्टल बंद करण्यात आलं आहे. ते पोर्टल चालू करुन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सरकारकडे केली.
नेमका काय आहे निर्णय –
महायुती सरकारच्या निर्णयानंतरही आता जिल्हा बँक शेतकऱ्यांकडून व्याज करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी होण्याऐवजी वाढली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 23 हजार शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा महत्त्वाचा मुद्दा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज विधानसभेत मांडला. तसेच सरकारने याबाबत पाठपुरावा करण्याची महत्त्वाची मागणी केली.
हेही पाहा : ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत