पाचोरा, 31 मे : शेती आणि शेती करणाऱ्या तरुणाईकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं गरजेचंय आणि याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून युवा शेतकरी मॉडेल या अनोख्या आणि अत्यंत कौतुकास्पद उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांच्या वतीने पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी प्रविण पाटील यांच्या शेतातून युवा शेतकरी संवाद मेळाव्याची सुरूवात करण्यात आली. या मेळाव्यात तालुक्यातील युवा प्रगत शेतकऱ्यांनी परिसरातील शेतकरी बांधवांना महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं. तर या उपक्रमाच्या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी विशेष संवाद साधला आणि या उपक्रमा मागचे त्यांचे विचार नेमके काय आहेत, हा उपक्रम त्यांना का राबवावासा वाटला, याबाबत महिती जाणून घेतली.
हेही पाहा : special interview on disaster management : आपत्ती व्यवस्थापनासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाची तयारी