चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 14 मे : ‘मी स्वतःला खरच खूप भाग्यवान समजतो मला सहचारिणी म्हणून तू लाभली, संसार, आणि मुलांचे संगोपन तू अतिशय प्रामाणिकपणे केले!! परमेश्वराकडे माझे एकच मागणे आहे, जन्मोजन्मी पत्नी म्हणून तुझीच साथ लाभावी!!!!’, असे म्हणत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या पत्नी आणि पाचोरा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुनिता ताई पाटील यांना आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शब्दात शुभेच्छा दिल्या.
आमदार किशोर आप्पा पाटील आणि त्यांच्या पत्नी पाचोरा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांचा लग्नाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुनिताताईंसाठी खास शब्दात पोस्ट लिहित त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार किशोर आप्पा पाटील यांची सुनिताताईंसाठी खास पोस्ट –
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर लिहिले की,
“प्रिय सुनिता
आपल्या सहजीवनाचा आजचा दिवस म्हणजे केवळ एक तारीख नाही – तर आपल्या नात्याच्या प्रत्येक क्षणात गुंफलेली प्रत्येक क्षणाची साक्ष आहे!!!
माझ्या राजकीय सामाजिक जीवनात अनेकदा चढ उतार आले पण प्रत्येक क्षण अन क्षण तू माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहिलीस माझ्या संघर्षात तुझे मोलाचे योगदान आहे!!!
मी स्वतःला खरच खूप भाग्यवान समजतो मला सहचारिणी म्हणून तू लाभली, संसार, आणि मुलांचे संगोपन तू अतिशय प्रामाणिकपणे केले!!
परमेश्वराकडे माझे एकच मागणे आहे, जन्मोजन्मी पत्नी म्हणून तुझीच साथ लाभावी!!!!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!’