ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 ऑक्टोबर : पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील अटल मैदानावर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यावतीने महायुतीच्या निर्धार मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब मांडत जोरदार भाषण केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील म्हणाले की, माझ्या मुलीने जे काही सांगितले, मी गेल्या 25 वर्ष- झाली घरावर तुळशीपत्र ठेऊन या मतदारसंघातील या मतदारसंघातील नागरिकांसाठी रात्रंदिवस 18-18 तास काम करण्याचा प्रयत्न केला. आणि तेच तिच्या डोळ्यांमधील अश्रू सांगत होते, की आम्हाला आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि आमच्या वडिलांनी नेमकं काय करताय. आणि तिला आजचे चित्र पाहून अश्रू अनावर झाले आणि तिला पटले की माझा बाप काय करत होता.
“…..हाच माझा आजचा विजय ! –
आमदार पाटील पुढे म्हणाले की, बेटा तु काळजी करण्याची गरज नाही. ह्या तुझा बापाच्यासोबत सगळा माय-बाप याठिकाणी उपस्थित आहे. एक बहिण नयी …फक्त राजकारणात. ती अशी माझी कायमस्वरूपच बहिण आहे. पण या सगळ्या हजारो लाडक्या बहिण माझ्या पाठिशी असून तु काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज जे काही चित्र आहे ना, ते तुला सांगून जातंय. उद्याच्या विजयाची काळजी करू नको. उद्या काय होईल, हे मला माहित नाही. मात्र, आज उपस्थित असलेल्या माता-बहिणींनी दाखवलेले चित्रय ना…हाच माझा आजचा विजय आहे, असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार किशोर पाटील यांना मांडला हिशेब –
यावेळी आमदार पाटील यांनी गेल्या पाच वर्षांचा हिशेब मांडत मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच गेल्या 25 वर्षांत रात्रंदिवस 18 तास काम करण्याचा प्रयत्न केला. पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या इतिहासात जे कुणी स्वप्नातही पाहिलं नसेल ना ते स्वप्न साकार करण्याचे काम केले आहे, असे आमदार किशोर पाटील म्हणाले. तत्पुर्वी, आमदार किशोर पाटील यांच्या कन्या प्रियंका पाटील यांना भाषणात आमदार किशोर पाटील यांच्याबाबत बोलताना गहिवरून आले होते.
एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणंमुळेच मुख्यमंत्री होतील –
आमदार किशोर पाटील यांनी महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय संस्थांमध्ये 25 लाख तरूणांना 10 हजार रूपयांप्रमाणे 6 महिने नोकरी देण्याचे काम केले असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणंमुळेच मुख्यमंत्री होतील, असेही आमदार किशोर पाटील यावेळी म्हणाले.
मी लंगोट बांधून तयार –
माझ्यासमोर अनेक पैलवान तयार होतएत. पण, नेमका कोण मैदानात आहे, हे काही अजून समजले नाही. त्यामुळे आज सगळ्यांच्या साक्षीने ढोल-ताशे सगळे तयार ठेवा, हा तुमचा किशोर आप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोट बांधून तयार झालेला आहे. जो कुणी येईल त्याला आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही, अशापद्धतीने प्रचाराचे रणशिंग आमदार किशोर पाटील यांनी यावेळी फुंकले.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : माजी आयपीएस अधिकारी Dr. Meeran Chadha Borwankar यांची विशेष मुलाखत