ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 23 मे : हजला गेल्यानंतर आपल्या जीवनातील नवीन पर्वाला सुरूवात करण्याचे काम हज यात्रा करणाऱ्यांकडून होते, असे प्रतिपादन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथे केले. आपल्या जीवनात अनेक चुका होतात. आपण माणूस आहोत तर चूक होतातच. मात्र, भविष्यात कुठलीही चुक होणार नाही, याचीही आपण काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
पाचोरा येथील नूर मस्जिद येथे पवित्र अशा हज यात्रेच्या माध्यमातून मुस्लिम समुदाय यांचे पावित्र्य स्थान मक्का-मदिना येथे जाणार्या समाज बांधवांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.
यावेळी मौलाना झाशान रजा, शिवसेना संघटक व माजी नगरसेवक बंडू चौधरी, शिवसेनेचे शाकीर बागवान, प्रविण ब्राम्हणे, मेहमूद खानमुस्लिम बागवान, जावेद सर, नवीद देशमुख, उर्दू शाळा केंद्र कदीर जनाब, मतीन बागवान, अल्पसंख्याक शहर प्रमुख अल्ताफ खान, तसेच मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी