चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 5 सप्टेंबर : “कुठल्याही विषयाची माहिती घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे ते मांडायचे आणि याबाबतचे श्रेय घ्यायचे. म्हणून पेपर फोडून पास होणारा हा माणूस आहे,” अशी टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी खासदार उन्मेश पाटील यांचे नाव न केली. जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. यानिमित्ताने जळगावात ते पत्रकारांसोबत बोलत होते.
मंगेश चव्हाण यांचा उन्मेश पाटील यांच्यावर पलटवार –
माजी खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपुर्वी दूघ संघाच्या कारभाराबाबत दूध संघाचे चेअरमन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आमदार चव्हाण यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. चाळीसगावच्या कत्तलखान्यावरूनही आमदार चव्हाण यांनी उन्मेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, लवकरच मी पत्रकार परिषद घेत कागदपत्रांसह उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
‘उन्मेश पाटील श्रेय घेण्यासाठी पुढे आलेत’ –
माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दूध संघात दूधाची भेसळ केली जात असल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की, दहा वर्ष सत्तेत असताना त्यांना कधी शेतकरी तसेच गाय-दूध दिसले नाहीत. आणि त्यांना आता कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला. शेतकरी आमचा उदोउदो करतील. म्हणून श्रेयासाठी तु पुढे आले. मात्र, ते काय आहेत. हे सर्वांना माहिती आहे. तसेच आमच्या मतदारसंघात त्यांना कुत्र विचारत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी नाव न घेता केली. दरम्यान, आम्ही आता दूध संघाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला बोनस आणि लाभांशाचा निर्णयाचे देखील ते श्रेय स्वतः घेतील, अशी खोचक टीकाही आमदार चव्हाण यांनी केलीय.
दूध संघाच्या बैठकीतील निर्णय –
जळगाव जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती देताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, दूध संघाची वार्षिक बैठक ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दूध संघ ज्यावेळी आमच्या ताब्यात आले, त्यादिवशी 9 कोटी 62 लाख रूपये इतका तोटा होता. मात्र, मार्चपर्यंत 2 कोटी 88 लाख रूपये कमी करून 6 कोटी 72 लाख रूपये इतक्यापर्यंत तो तोटा आला. दूध संघाला या वर्षांत साडे नऊ कोटी रूपयांपर्यंतचा ऐतिहासिक नफा झाला आहे. दरम्यान, मागचा तोटा वगळता प्रति लिटर 70 पैसे बोनस आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा 8 लाभांश देण्याचा निर्णय दूध संघाच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा : “जळगाव दूध संघात आता लाडका साडू योजना अन् कोट्यवधींचा काळाबाजार,” माजी खासदार उन्मेश पाटील यांचा आरोप