चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 9 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक मुद्दे उपस्थित केले जात होते. दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त आज शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या सभेत राज ठाकरे यांनी मनसेच्या भूमिकेबद्दल सगळं काही स्पष्ठ केले.
काय म्हणाले राज ठाकरे? –
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर बोलताना स्पष्ठ केले की, माझी महाराष्ट्रातील अपेक्षा आहे की, जनतेकडून व्याभिचाराला राज मान्यता मिळू नये. तस झाले तर पुढचे दिवस भीषण आहेत. ज्यावेळी वाटाघाटी सुरु होत्या तेव्हा मी यांना सांगितले की, मला विधानपरिषदही नको आणि राज्यसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे मी जाहीर करत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ठ केले.
लोकसभा निवडणूकीबाबत काय म्हणाले? –
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, सर्वाधिक तरुणांचा देश ना अमेरीका आहे ना जपान आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. या तरुण-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केले पाहिजे. तरुणांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष दिले पाहिजे. तब्बल 6000 पेक्षा जास्त उद्योगपती देश सोडून निघून गेलेत. यासाठी उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. 10 वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. म्हणून येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका –
राज ठाकरे पुढे म्हणाले की, 370 कलम रद्द झाले तेव्हा अभिनंदन केले. ज्या गोष्टी चांगल्या घडल्या त्याच अभिनंदन केले आहे. मी कधीही व्यक्तीगत टीका करतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तीगत टीका करतात, तशी मी टीका मी करत नाही. मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून मी टीका करत नाही. तुम्हाला सत्तेत हाकलून दिले म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांना लगावाला.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!