मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 23 मे : चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील जवान सुनिल धनराज पाटील हे मागील वर्षी 5 ऑगस्ट 2024 रोजी वीरगतीस प्राप्त झाले होते. काही दिवसापूर्वी त्यांचे मूळ गावी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. दरम्यान, या स्मारकास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी काल गुरूवार 22 मे रोजी भेट देऊन शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण केली.
तसेच शहीद जवान यांच्या परिवारातील सदस्य, वीरमाता व वीरपत्नी यांच्याशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह चोपडा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचे हस्ते नुकतेच झाले होते अनावरण –
अमरजवान सुनिल धनराज पाटील हे 5 ऑगस्ट 2024 रोजी देशसेवा करत असताना शहीद झाले होते. चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे शहीद जवान सुनिल धनराज पाटील यांच्या स्मारकाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
हेही वाचा : चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे पालकमंत्र्यांचे हस्ते शहीद जवान सुनिल पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण