नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : जे स्वतःला शिवसेना समजत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतील मोदी-शहांना दिले असतील तर त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये, अशा शब्दात राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या भूमिकेवर प्रतिक्रया दिली आहे. ते आज सकाळी माध्यमांसोबत बोलत होते. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीचा अधिकार असल्याचेही राऊत म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले? –
एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची भूमिका जाहीर केली होती. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जे निर्णय घेतील, तो निर्णय मला किंबुहना शिवसेनेला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. दरम्यान, आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधलाय.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. यानंतर मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार हा त्यांचा आहे. असे असताना युतीतील दोन पक्षांनी दिल्लीला मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार दिला आहे. आता दिल्ली ठरवेल महाराष्ट्राचे भविष्य, असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला.
कृपया, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
महाविकास आघाडीतून शिवसेना (ठाकरे गट) बाहेर पडणार? –
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतून शिवसेना (ठाकरे गट) बाहेर पडणार अशा चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत राऊत म्हणाले की, विधानसभेचे आताच निकाल लागले आहेत. निकालाबाबत सर्वच पक्षांचे मंथन सुरू आहे. तिन्ही पक्षांना धक्का बसलेला आहे. पराभवाच्या कारणांचा शोध घेत असताना त्याची दिशा ही ईव्हीएमकडे जातेए. यामुळे आम्हाला तीनही पक्षांना एकत्रित बसून काही निर्णय घ्यायचे आहेत.
दरम्यान, निवडणुकीत स्वतंत्र लढायला हवे होते, अशी काही कार्यकर्त्यांची भूमिका असते. यामुळे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ह्या बातम्यांवर विश्वास ठेवावा, अशा नाहीयेत, असे राऊत यांनी यावेळी स्पष्ठ केले.
महायुतीला कोणताही नियम नाही –
महायुतीला पुर्णपणे बहुमत असतानाही राज्याचा मुख्यमंत्री ठरत नाही. खरंतर, महायुतीला मिळालेला बहुमत हे जनतेचा कौल नाही. तरीही तीन पक्षाला पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाहीये. विधानसभेची 26 नोव्हेंबर रोजी मुदत संपलीय. याठिकाणी जर आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले असते. दरम्यान, नियम-कायदे हे फक्त विरोधी पक्षांना आहेत. बहुमत प्राप्त झालेल्या महायुतीला कोणताही नियम नसल्याचीही टीका संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी : “….अभी तो सारा आसमान बाकी हैं!” एकनाथ शिंदेंनी केली मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका स्पष्ट