नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे हे सरंक्षणमंत्रीपद देखील मागू शकतात. चर्चेत काहीही मागू शकतात. राष्ट्रपतीपद देखील मागू शकतात. मात्र, दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावे लागेल. शेवटी अजित दादा किंवा एकनाथ शिंद असतील यांना महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे तो राहिलेला नाही. हे शरणागत आहे. यामुळे त्यांना जे हवंय ते मागतील. मात्र, त्यांना जे हवंय ते त्यांना कधीच मिळणार नाही, असा टोला राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीनंतर लगावला आहे. ते आज सकाळी नवी दिल्लीत माध्यमांसोबत बोलत होते.
संजय राऊत यांची टीका –
संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपने महाराष्ट्र कमजोर केला. शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष फोडण्यासाठी एकनाथ शिंदे-अजित पवार यांची मदत घेतली. आता त्यांच्याकडून जे काम करायचे होते, ते भारतीय जनता पक्षाने करून घेतलंय. यामुळे भविष्यात या दोघांचे पक्ष भाजपने फोडले आणि आपलं बहुमत मिळवले तर त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही. दरम्यान, ईव्हीएमचा घोटाळा यापेक्षा भयंकर उघड होईल, असेही राऊत म्हणाले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
बाबा आढाव यांच्या आंदोलनाबाबत राऊत काय म्हणाले? –
वयाच्या शंभरीकडे झुकलेला बाबा आढाव यांच्यासारखा गांधीवादी कार्यकर्ता ईव्हीएमच्या घोटळ्यावर लोकशाही वाचविण्यासाठी आज रस्त्यावर आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने याची जाणीव ठेवली पाहिजे. लोकशाहीची मशाल विझू नये, यासाठी बाबा आढाव यांच्यासारखे लोक काम करत असल्याचे राऊत म्हणाले.
राऊतांचा अजित पवार यांना खोचक टोला –
राजकारणातील सत्तेसाठी कोणीही कोणत्याही स्तराला घसरू शकतो. अजित पवार हे काय उपमुख्यमंत्री आहेत. ते भावी वैगेर किंवा माजी नसतात ते सदैव उपमुख्यमंत्री असतात आणि कौतुकास्पद हे आहे की आज त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य आहे. लोकसभा निकालानंतर हे हास्य मावळले होते. मात्र, ते हास्य आज पुन्हा दिसत आहे. खरंतर, त्यांनी एकाबाजूला ईव्हीएम आणि दुसऱ्या बाजूला मोदी-शहां अशी मंदिरे यांनी बांधली पाहिजे. यामुळे त्यांचे हास्य कायम राहील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
View this post on Instagram
हेही वाचा : अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत काय घडलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?