मुंबई, 20 मे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024’ची परिक्षा फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ह्या परिक्षेला अडीच महिने उलटून गेल्याने निकालाला विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, काल 19 मे रोजी ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024’चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
नेमकी बातमी काय? –
एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेअंतर्गत सहायक कक्ष अधिकारी (54 पदे), राज्य कर निरीक्षक (209 पदे) आणि पोलिस उपनिरीक्षक (216 पदे) अशा एकूण 479 पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबवली जात असून मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या वर्षाच्या सुरूवातीला 5 जानेवारी 2025 रोजी होण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव ती पुढे ढकलून 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली. दरम्यान, परीक्षेनंतर तीन दिवसांनी 5 फेब्रुवारीला पहिली उत्तरतालिका, तर 4 मार्चला दुसरी उत्तरतालिका जाहीर करण्यात आली.
अडीच महिन्यानंतर निकाल जाहीर –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आज, 19 मे 2025 रोजी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा एकत्रित पूर्व परीक्षा 2024 चा निकाल अधिकृतपणे जाहीर केला. भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात मुख्य परीक्षेसाठी एकूण 8179 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आयोगाने पुर्व परिक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या आणि आता गट ब मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असलेल्या उमेदवारांचे रोल नंबर आणि नावे सूचीबद्ध केली आहेत.
परीक्षेला बसलेले उमेदवार www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकणार आहेत. तसेच निकाल श्रेणीनिहाय कटऑफ गुणांसह पीडीएफ स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहेत.
नेमकं मिरिट किती लागलं? –
MPSC गट ब च्या पुर्व परिक्षा 2025 चा निकाल कसा तपासायचा?
MPSC गट ब च्या पुर्व परिक्षा 2025 निकाल खालीलप्रमाणे तपासू तसेच डाउनलोड करू शकतात.
- अधिकृत वेबसाइट www.mpsc.gov.in ला भेट द्या.
- होम पेजवर, ‘लेटेस्ट अपडेट्स’ विभाग तपासा.
- त्यानंतर “MPSC Group B Examination 2025 Result,” या पर्यायावर क्लिक करा.
- उमेदवारांना PDF उघडून Ctrl+F वापरून त्यांचा रोल नंबर शोधावा लागेल.
हेही वाचा : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन