नांदेड : नांदेड येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. नांदेडचे काँग्रेस पक्षाचे खासदार वसंत चव्हाण चव्हाण यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली. दरम्यान, आज पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज पार्थिव येणार –
खासदार वसंत चव्हाण यांचे पार्थिव आज दुपारी नायगावला आणला जाणार आहे. यानंतर उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून वसंत चव्हाण आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली. यादरम्यान, आज पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. यानंतर उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का –
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार असलेले प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नांदेडमधून निवडणूक लढवली होती. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत वसंत चव्हाण यांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. ते दोन वेळा आमदार राहिले होते आणि एकवेळा खासदार राहिले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अर्पित केली श्रद्धांजली –
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी श्रद्धांजली अर्पित केली.
हेही वाचा – महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला कठोर इशारा, म्हणाले..