पाचोरा, 22 फेब्रुवारी : शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि अशी माणसं पत्रकारितेत असली तर येणारा काळ हा सुगीचा असेल आणि आपण खरंच योग्य रस्त्याने जाऊ असे सांगत भविष्यात या सुवर्ण खान्देशचे सॅटेलाईट चॅनेलमध्ये रुपांतर व्हावे, या शब्दात प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा द्वितीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम काल पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड हे होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा नायब तहसिलदार कुमावत, भडगावचे नायब तहसिलदार, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य मधुकाटे, पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहायक मयुर येवले उपस्थित होते. यावेळी यांच्यासोबत इतर मान्यवरांनीही यावेळी आपली मते मांडली.
काय म्हणाले दिलीप मोहिते –
प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यावेळी म्हणाले की, पत्रकार ही फार कठीण अवस्था आहे. पत्रकारांसाठी खूप कठीण काळ आहे. 2010 मध्ये मी श्रमिक आधार पत्रकार संघ स्थापन केला. त्यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि कृष्णा पाटलांचा एक श्रमिक पत्रकार संघ होता. त्यानंतरच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक पत्रकार संघ स्थापन झाले आहेत. ज्यावेळी सायंकाळ दैनिक, दैनिक आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्यानंतर यूट्यूब चॅनेल या रस्सीखेचमध्ये जर आपण मागचा काळ पाहिला तर पत्रकारितेचं वजन हे खूप, ती ताकद खूप पॉवरफूल होती. पत्रकारितेत प्रचंड ताकद आहे.
पत्रकारितेच्या दबाबावून आर. आर. आबा, विलासराव देशमुख यासारख्या मान्यवरांना राजीनामा द्यावा लागला. कारण त्यावेळची पत्रकारिता हा पैशाविना चालायची. आता पत्रकारिता म्हणजे फक्त येऊ द्या आणि खाऊ द्या, अशी परिस्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ क्लीप पाहिली त्यावरुन मला असं जाणवलं की, शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि अशी माणसं पत्रकारितेत असली तर येणारा काळ हा सुगीचा असेल आणि आपण खरंच योग्य रस्त्याने जाऊ असे सांगत भविष्यात या सुवर्ण खान्देशचे सॅटेलाईट चॅनेलमध्ये रुपांतर व्हावे, या शब्दात दिलीप मोहिते यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभार सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी मानले. यावेळी सुवर्ण खान्देशचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांचा लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, पाचोरा पत्रकार संघाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या पाचोरा टीमच्या वतीने, कल्पेश टीचे जगन्नाथ महाजन, एसएसआर ट्रेडर्सचे रकीब देशमुख सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘समाजाची गरज ओळखून पत्रकारिता करण्याची गरज’, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन