नाशिक, 15 सप्टेंबर : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना मुरूम उत्खननविरोधात कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडले होते. त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील अजित दादांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. नाशिक येथे काल 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शबिरात रोहिणी खडसे बोलत होत्या.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या? –
रोहिणी खडसे म्हणाल्या की, ज्याच्या हातात सत्ता असते त्यांच्याकडून अशी अपेक्षा असते की, माता बघिनींना मान-सन्मान दिला गेला पाहिजे. महिलांना सुरक्षित वातावरण दिलं गेलं पाहिजे. पण, ज्यांच्या हातात सत्ता दिली गेलेली आहे, तेच लोक भक्षक बनत असतील अथवा माता बघिनींचा अपमान करत असतील तर आपण आवाज उठवलाच पाहिजे.
अजित दादांचे नाव घेता रोहिणी खडसेंची टीका –
दरम्यान, एक आयपीएस अधिकारी जी स्वतःचं कर्तृत्व दाखवत होती; स्वतःचं काम करत होती आणि त्याच महिला अधिकाऱ्याला याच सरकारमधील मंत्री अरेरावीची भाषा करत दमदाटी देतात की तू तुझं कर्तव्य पार पाडू नये. अशा लोकांकडून आपण महिला बघिनींच्या सुरक्षित वातावरणासाठी अपेक्षा करत असू तर मला वाटत ते होणं शक्य नसल्याची टीका रोहिणी खडसेंनी अजित दादांचे नाव घेता लगावलाय.
View this post on Instagram
कुर्डूवाडी प्रकरण –
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील मुरूम प्रकरणात कारवाई करत असता महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे अजितदादा वादात सापडले होते. मुरूम उत्खननविरोधातील कारवाई थांबविण्याचे आदेश अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना दिले होते. यानंतर राज्यात या प्रकरणाबाबत अजित पवारांवर टीका करण्यात आली. यानंतर अजित दादांनी संबंधित घटनेबाबत त्यांची भूमिका देखील स्पष्ठ केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सदर घटनेची नोंद घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवणार असल्याचे सांगितले होते.