नाशिक, 15 सप्टेंबर : नाशिक येथे काल 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर पार पडले. दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण या तरूणीने जळगावच्या मॉबलिंचिंगच्या घटनेचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं.
मर्जिया पठाण काय म्हणाल्या? –
मर्जिया पठाण म्हणाल्या की, जळगावमध्ये ज्यावेळी मी गेली त्यावेळी तीन खून प्रकरण घडले होते. यामध्ये एक मॉबलिंचिंगचे एक प्रकरण होतं. तिथे युवकांमध्ये क्रोध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामागे मोठ्या राजकीय नेत्यांकडून राजकीय व्यासपीठांवर द्वेषपूर्ण भाषण केले जात आहेत. खरंतर, युवकांमध्ये रोजगार नाही. गरिबी तसेच महागाईचा देखील सामना करावा लागतो.
दरम्यान, ज्यावेळी तुम्ही नागरिकांना सामाजिक संस्थांपासून दूर कराल त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडून जे हवं ते केलं जाऊ शकतं. यामुळे युवकांमध्ये ज्यापद्धतीने ठिणगी पेटवण्याचं काम केलं जातंय याचा अर्थ असा नाहीये की, ते फक्त एका समाज-समुदायाच्या लोकांना जाळेल. ‘जब आग लगती है तो पूरा गाव जलता है, पूरा समाज जलता है’ आणि नेपाळ हा देश याचं खूप मोठं उदाहरण असल्याचे मर्जिया पठाण म्हणाल्या.
View this post on Instagram
‘शरद पवारांचाचा आम्हाला आधार मिळू शकतो’ –
जळगावात नुकतंच मॉब लिंचिंगचे प्रकरण घडले. मात्र, माध्यमांनी व्यवस्थितरित्या कुठेही त्याचे वार्तांकन केले नाही. ही अतिशय दुर्दैवी घटना होती. दरम्यान, तेथील नागरिकांमध्ये क्रोधाची भावना असून जळगावातील ही स्थिती तुम्ही शरद पवारांना सांगा कारण, त्यांचाच आम्हाला आधार मिळू शकतो, असेही त्याठिकाणचे नागरिकांनी मला सांगितल्याचे मर्जिया पठाण म्हणाल्या.
कोण आहेत मार्जिया पठाण? –
मर्जिया पठाण या मुंब्रा येथील असून तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते. त्या ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांची मुलगी आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या समस्या आणि प्रश्नांवर त्या आवाज उठवत असतात. मर्जिया यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने तिची राष्ट्रीय कार्याध्यक्षपद नियुक्ती केली. मर्जिया यांनी नुकताच जळगाव जिल्हा दौरा करत जळगावात घडलेल्या वेगवेगळ्या खून प्रकरणाच्या तीन घटनांमध्ये पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं होतं.