• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘महाराष्ट्रात पोलिसांचा, कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलीये’, एकनाथ खडसेंची सरकारवर जोरदार टीका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 4, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
no fear of police and law in Maharashtra Eknath Khadse strongly criticizes the government

'महाराष्ट्रात पोलिसांचा, कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलीये', एकनाथ खडसेंची सरकारवर जोरदार टीका

मुंबई : संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर त्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आलेले आहेत. हे फोटो अत्यंत अमानुष, घृणास्पद, चीड येतील असे आहेत. अशा स्वरुपाची जर हत्या होत असेल तर या राज्यात कायदा व सुव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे, हे आपण बघितलं पाहिजे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलेली आहे, असं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यादरम्यान आज विधानभवन परिसरात एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिला आहे. गेले तीन महिन्यांपासून सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आणि याबाबत आज त्यांनी राजीनामा दिला. पण धनंजय मुंडेंचा राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्यातून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भात जे छायाचित्र प्रकाशित झाले, अत्यंत निर्घृण पद्धतीने ही हत्या करण्यात आली. हे छायाचित्र पाहावले जात नाही, अशा स्वरुपाचे आहेत आणि अशा निर्घृण हत्या करणाऱ्यांना जर कुणाची साथ असेल, असे निष्पन्न होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

तर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत म्हटले की, मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे,’ यावर एकनाथ खडसे म्हणाले की, राजीनामा दिल्यानंतर कुणीही व्यक्ती त्या राजीनाम्याचं समर्थन करत असताना काहीतरी कारणं शोधत असतो. तसं कारण मुंडेंनी त्याठिकाणी शोधलेलं दिसत आहे.

तर या मंत्रिमंडळात एकही सदस्य राहू शकणार नाही –

पुढे बोलताना ते म्हणाले की, नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबत घडलं होतं. वास्तविक पाहता माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. मी काही ती जमीन घेतलेली नव्हती किंवा आजही घेतलेली नाही. फक्त एक साधी मिटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून त्याच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला. असा जर राजीनामा घ्यायचा म्हटला तर या मंत्रिमंडळात एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा तर यांना प्रत्येकालाचा राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही, म्हणून इतके दिवस आपल्याला वाट पाहावी लागली.

संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर त्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आलेले आहेत. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, हे फोटो अत्यंत अमानुष, घृणास्पद, चीड येतील असे आहेत. अशा स्वरुपाची जर हत्या होत असेल तर या राज्यात कायदा व सुव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे, हे आपण बघितलं पाहिजे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलेली आहे, असं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

हेही वाचा – dhananjay munde resignation : मंत्रिपदाचा राजीनामा का दिला?, स्वत: धनंजय मुंडेंनीच सांगितलं कारण

हेही वाचा – ‘लाज वाटली पाहिजे, रईस…छावा सिनेमा बघा’, अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत एकनाथ शिंदे आक्रमक, केली मोठी मागणी..

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisdhananjay mundeeknath khadsemaharashtra governmentmaharashtra politicssantosh deshmukh murder case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page