ईसा तडवी, प्रतिनिधी
वरखेडी (पाचोरा), 1 मार्च : पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे अवैधरित्या स्वतःच्या फायद्यासाठी कॉम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने चक्री नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवित असल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी आज 1 एप्रिल रोजी कारवाई केली. याप्रकरणी सागर अशोक चौधरी (रा. वरखेडी ता.पाचोरा) याला ताब्यात घेत पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी येथील बाजारपट्टा भागात सागर अशोक चौधरी हा अवैधरित्या स्वतःच्या फायद्यासाठी कॉम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने चक्री नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवित होता. याबाबतची गुप्त माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाली.
यानंतर पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, पो.कॉ. अमोल पाटील, पो.कॉ. नामदेव इंगळे, चापोकॉ. दिपक आहिरे, पो.कॉ. विकास पवार यांनी वरखेडी येथे जात अधिकचा तपास करून छापा टाकत आरोपी सागर अशोक चौधरी याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडून सॅमसग कंपनीची LED, CPU, केबल, अॅडप्टर, किबोर्ड, माउस तसेच 15 हजार रूपये रोख असा एकूण त्याच्याकडून 27 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित दिलीप निकम यांनी फिर्याद दिल्यानुसार, सागर चौधरी याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोहेकॉ किरण लक्ष्मण ब्राम्हणे हे पुढील तपास करत आहेत.
हेही पाहा : ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत