पाचोरा, 5 जुलै | पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात काल शुक्रवार 4 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या भयानक घटनेत एक तरूणाचा मृत्यू झाला. आकाश कैलास मोरे (वय – 32, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत महत्त्वाची माहिती दिली. दरम्यान, या घटनेबाबत सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा हा ‘स्पेशल रिपोर्ट’