• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

CM Devendra Fadnavis : एक शिक्षक पूर्ण समाज बदलू शकतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 7, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
CM Devendra Fadnavis : एक शिक्षक पूर्ण समाज बदलू शकतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, 6 मार्च : एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांनी तत्कालीन समाज घडविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या दोघांनी नवीन समाजाची निर्मिती करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले असल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मौजे पैजारवाडी येथे शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांचे उभारण्यात आलेल्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण हे व्यक्तीला घडविते. सुसंस्कृत समाज निर्मितीला सहाय्यभूत ठरते. या ठिकाणी उभारण्यात आलेले या दोन्ही मान्यवरांचे पुतळे समाजाला प्रेरणा देतील.

याप्रसंगी मंचावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री गोपिचंद पडळकर, डॉ. विनय कोरे, अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

हिरवे गुरुजी यांनी कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यात 60 वर्षापूर्वी सुमारे 104 शाळा तसेच एका वसतिगृहाची उभारणी केली. हे अतुलनीय कार्य समाज नक्कीच लक्षात ठेवेल. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याच्या आठवणीची जाणीव नवीन पिढीला व्हावी, तसेच त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठीच या अर्धाकृती पुतळ्यांची उभारणी करण्यात आल्याचे आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे पारंपारिक पद्धतीने धनगरी ढोलाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची परमपूज्य सदगुरु चिले महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी हिरवे कुटुंबियातील बाजीराव हिरवे, तानाजी हिरवे, उल्हास हिरवे, उमेश हिरवे, विनोद हिरवे, प्रमोद हिरवे तर देशपांडे कुटुंबियातील शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या पत्नी श्रीमती शैलजा देशपांडे, ऋषीकेश देशपांडे, स्मिता टिपणीस, माधवी देशमुख, अश्विनी भावे, स्वाती खोपकर, मुक्ता देशपांडे व त्यांचे कुटुंबिय तसेच मौजे पैजारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.

हेही वाचा : Meghna Bordikar : कॅन्सर रुग्णांसाठी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdevendra fadnavis kolhapur visitmarathi newssuvarna khandesh liveteacher

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page